अहिल्यानगर जिल्ह्यासह देश-विदेशामध्ये प्रसिद्ध असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर या ठिकाणी आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आणि तोही शनी अमावस्या आल्याने या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून शनी अमावस्या निमित्त शनिदर्शनासाठी भाविकांनी शनि मंदिरामध्ये गर्दी केल्याचं पहायला मिळत आहे. अमावस्या निमित्त रात्रभर मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आलं होतं. पाच ते सात लाख भाविक येण्याचा अंदाज विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी बोलून दाखवला आहे.