पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात झालेल्या लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीने पतीला लिव्हर दान केले होते. ऑपरेशननंतर दोघांचाही मृत्यू झाल्याने रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप आहे. नातेवाईकांनी रुग्णालय आणि डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.