मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय सहकारी गंगाधर काळकुटे यांच्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी घणाघाती हल्ला चढवला आहे. काळकुटेंना जरांगेंनी पाळलेले “काळकुत्रे” अशी उपमा देत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. जरांगे आता मुंबईला जाणार असून, बीड जाळल्याप्रमाणे तेथील वातावरणही पेटवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला.












