राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणातून विसर्ग सोडण्यात येत असल्याने कृष्णा, कोयना, पंचगंगा, भीमा नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. कोल्हापुरला पंचगंगेचा तर सांगलीला कृष्णेचा वेढा पडला असून, कालच्या तुलनेत पाणीपातळीत घट झाली असली तरी पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे.