भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड रस्ता आणि काँक्रीट आणि पेवर ब्लॉकमधील असमतोल गॅपमुळे दुचाकी घसरून एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. डॉ. मोहम्मद नशीम अन्सारी मृत डॉक्टरांचे नाव असून, आपल्या घरी परतत असताना हा भीषण अपघात घडला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.












