गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित्या रस्त्यांवरील टोलनाक्यावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
या निर्णयानुसार, 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित्या रस्त्यांवरुन कोकणात जाणाऱ्या भाविकांना तसेच एसटी बसला टोलमाफीची सवलत मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव सचिन चिवटे यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. ग्रामीण व शहर पोलिस, आरटीओ यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पासची एकत्रित माहिती सार्वजनिक बाधकांम विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत..
कुठे मिळणार पास?
- परिवहन विभाग
- वाहतूक विभाग
- पोलिस ठाणे,
- आरटीओ यांनी समन्वय साधून पोलिस ठाणे,
- वाहतूक पोलिस चौकी
- आरटीओ












