पुण्यातील एका ‘पब’मध्ये शेकडो अल्पवयीन मुलांना ओळखपत्र न पाहता प्रवेश दिला जात होता. तसेच, त्यांना सरसकट मद्य विक्री सुरू होती. या पार्टीचे कोणतेही रेकॉर्ड रजिस्टर ठेवले नव्हते. अनेक कॉलेजमधील सतरा ते एकवीस वयोगटातील मुलांना ‘पब’चालकांनी प्रवेश दिल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या संदर्भात आरोप केले आहेत. मनसे कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.












