परळी तालुक्यातील जळगव्हाण तांड्यावर अंगणवाडी संदर्भात आंदोलनाला साथ दिल्यामुळे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल चव्हाण हा तरुण गावातील अंगणवाडीविषयी आंदोलनात साथ होता. याला साथ दिल्याच्या कारणावरून रात्री उशिरा अजित पवार गटाच्या सरपंचाने सहा जणांसह चव्हाण यांच्या घरी धडक मारली. या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र एवढ्या गंभीर प्रकारानंतरही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
बाईट : संगीता चव्हाण, पीडित महिला
बाईट : अनिल चव्हाण,