सांगली-पेठ राष्ट्रीय महामार्गावर आष्टा येथील राज पेट्रोलपंपाजवळ बिबट्याने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले. मनान पठाण आणि अरबाज खान असे जखमींची नावे असून त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडकेत बिबट्याही जखमी झाला असून तो शेतात पसार झाला. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.