कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे मिजगुळे दाम्पत्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. प्राथमिक तपासात पती दिलीप मिजगुळे यांनी चारित्र्याच्या संशयातून पत्नी स्वाती यांची हत्या करून आत्महत्या केल्याचे उघड झाले. मृत्यूपूर्वी पतीने भिंतीवर शेजाऱ्यांची नावे लिहिल्याचा दावा असून, यावरून पोलिसांनी गोरख चौरे, संदीप चौरे व आशा चौरे या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.