साईबाबांच्या बुंदी लाडू प्रसादाच्या दरात तब्बल 40% वाढ केल्याने भक्तांमध्ये नाराजी उसळली आहे. पूर्वी 20 रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकीट आता 30 रुपयांना मिळणार आहे. गोरगरिबांना परवडणारे 10 रुपयांचे आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे 25 रुपयांचे पाकिट बंद करून संस्थानने फक्त ‘प्रीमियम’ दर ठेवला आहे. मोफत भोजन व माफक दरातील सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून प्रसादावर दरवाढ का? असा प्रश्न विचारला जात आहे.