अमेरिकेच्या नवीन टॅरिफ नियमांमुळे भारतासह फ्रान्स, ब्रिटन, इटलीसह अनेक देशांनी अमेरिकेकडे जाणाऱ्या टपाल सेवा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. $८०० पेक्षा कमी किमतीच्या वस्तूंवरही शुल्क लागू करण्याच्या निर्णयामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. योग्य मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतर सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.