दोन दिवसांपूर्वी प्लॉटच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणात पाडसवाण यांचा आरोपी निमोणे यांनी चाकूने वार करून खून केला होता. या घटनेतील निमोणे नावाचे चार आरोपी सध्या तुरुंगात आहेत, तर पाडसवाण यांचे वडील गंभीर जखमी आहेत. आज राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि आरोपींना कठोर शिक्षा होईल, अशी ग्वाही दिली.












