वसई-विरार आणि मुंबई परिसरात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून अचानक जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कामावर जाण्याच्या वेळेत पाऊस असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.