पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरी गावातील तरुण चैतन्य यादव हा नौदलामध्ये भरती झाला आहे. यानंतर गावातील तरुणांनी आनंद व्यक्त करत त्याची गावातून मिरवणूक काढली. पारंपारिक पद्धतीने बैलगाडीमध्ये बसवून आणि ढोल लेझीम च्या साथीने चैतन्याची मिरवणूक करण्यात आली. देशाच्या सैनिकी सेवेमध्ये दाखल होणे हा या गावाला अभिमान वाटतो आणि म्हणूनच चैतन्य यादव याचा ग्रामस्थांनी मोठा सत्कार केला. या गावातील प्रत्येक कुटुंबातील किमान एक तरी सदस्य सैन्यामध्ये सेवा करत आहे.