बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात दोन जनांविरोधात गुन्हा दखल झाल्याने खळबळ उडाली आहे. अनेक आमदार-खासदारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणारे धनंजय धसे व त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर तब्बल साडेतेरा लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून धनंजय धसे हे सध्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे जवळचे मित्र आहे.