भारत सरकारने ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यानंतर पैशांच्या आधारावर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घातली. याचा थेट परिणाम फॅन्टसी गेमिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी ड्रीम11 वर झाला असून, कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवले आहे की ते आता भारतीय संघाचे स्पॉन्सर राहू शकणार नाही. दुबईत सुरू होणाऱ्या आशिया कपच्या फक्त दोन आठवडे आधी टीम इंडियाला नवीन स्पॉन्सर शोधावा लागणार आहे. ड्रीम11च्या माघारीमुळे बोर्डाला तब्बल 119 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.












