एसबीआय क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम 1 सप्टेंबरपासून बदलणार आहेत. या बदलामुळं क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांना धक्का बसणार आहे. एसबीआय कार्डसकडून एक नोटिफिकेशन काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे. 1 सप्टेंबरपासून काही कार्डसवरील रिवॉर्ड पॉईंट देणं बंद केलं जाणार आहे. ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर करण्यात आलेल्या कोणत्याही व्यवहारावर रिवॉर्ड पॉइंट दिले जाणार नाहीत.