यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील सायखेडामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडून महत्त्वाचे दस्तऐवज जाळल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे दुसऱ्यादिवशी ग्रामसभा असताना हा प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालीय. दरम्यान, भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, यासाठी हा प्रकार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे कृत्य करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.