मुंबई 26 ऑगस्ट 2025
भारतामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत असताना, जपानी ऑटोमेकर Suzuki ने आपली पहिली ग्लोबल इलेक्ट्रिक SUV e-Vitara लाँच केली आहे. गुजरातमधील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये या SUV चे उत्पादन सुरू झाले असून 26 ऑगस्ट रोजी पहिली युनिट रोलआउट करण्यात आली. भारतात या गाडीचे अधिकृत लॉन्च 3 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.
मुख्य वैशिष्ट्ये
- रेंज: एका चार्जमध्ये 500 किमी पेक्षा जास्त.
- बॅटरी पर्याय:
- 49 kWh बॅटरी, 144 hp इलेक्ट्रिक मोटर.
- 61 kWh बॅटरी, 174 hp इलेक्ट्रिक मोटर.
- व्हेरियंट्स: Delta, Zeta आणि Alpha – तीन पर्याय उपलब्ध.
- ad व्हान्स फीचर्स: टॉप व्हेरियंटमध्ये लेव्हल 2 ADAS आणि 360 डिग्री कॅमेरा.
- किंमत: अंदाजे ₹17 लाख (एक्स-शोरूम, भारत) पासून सुरू.
भारतातून 100 हून अधिक देशात निर्यात
e-Vitara ही भारतात बनवली जाणारी एक प्रमुख इलेक्ट्रिक SUV ठरणार आहे. Suzuki ने जाहीर केले की भारतातून या SUV ची निर्यात 100 पेक्षा जास्त देशांमध्ये केली जाईल.
Suzuki चे आगामी इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओ
e-Vitara व्यतिरिक्त Suzuki आणखी काही इलेक्ट्रिक वाहनं भारतीय बाजारात घेऊन येण्याच्या तयारीत आहे:
- eWX Electric Hatchback – ऑक्टोबर 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता.
- WagonR EV – 2026 च्या सुरुवातीला भारतात आगमन.
- Jimny EV – अंदाजे 400 किमी रेंजसह.
- Futuro E – जी सुरुवातीला 2024 मध्ये अपेक्षित होती.
Suzuki ची इलेक्ट्रिक दोनचाकी
चारचाकींसोबतच Suzuki दोनचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटवरही लक्ष केंद्रित करत आहे. e-Access 125 हा इलेक्ट्रिक स्कूटर ऑगस्ट 2025 मध्ये लॉन्च होणार असून एका चार्जमध्ये 95 किमी रेंज देईल.
स्पर्धक
भारतीय मार्केटमध्ये Suzuki e-Vitara ची थेट स्पर्धा Hyundai Creta EV, MG ZS EV आणि Mahindra BE 6 सोबत होणार आहे.
एकूणातच, Suzuki e-Vitara भारतातील मिड-सेगमेंट इलेक्ट्रिक SUV ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. आकर्षक रेंज, आधुनिक फीचर्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यातक्षम डिझाईनमुळे ही SUV भारतीय बाजारात मोठा प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे.
-अमित आडते
लेखक