महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत एस.टी. बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट प्रभागातून या सेवेची सुरुवात करण्यात आली. भाविकांना मोफत प्रवासासोबतच आरती संग्रह, बिस्किटे व पाण्याची सुविधा देण्यात आली. या वेळी स्थानिक नागरिकांसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












