शेतकऱ्यांच्या, शेतमजूराच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी सर्व शेतकरी संघटनांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे असून शेतकरी हक्क परिषदेची बैठक पार पडल्यानंतर आपापल्या राजकीय भूमिका व मतभेद बाजूला ठेवून केवळ शेतकरी हितासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन संघर्ष समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच मुंबई मध्ये कर्जमाफी बद्दल आंदोलन होणार असल्याची माहिती धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी दिली.