गणेशोत्सवाची लगबग वाढली असून रायगडच्या बाजारपेठा आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी फुलल्या आहेत. महाडसह विविध भागांत मकर बांधणीसाठी करवंटी, कवंडल आणि आरास साहित्य उपलब्ध झाल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. दुकानदारांच्या मते, यंदा नाविन्यपूर्ण सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी दिसत आहे.