आज लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे. आणि याचाच उत्साह हा सर्व ठिकाणी पहायला मिळतोय. बीडमध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाला आणि हाच उत्साह भाविकांमध्ये दिसून येतोय. बीडमध्ये यंदा लालबागच्या राजासह, दगडूशेठ हलवाई आणि बाल गणेशाची क्रेझ दिसून येतेय. मागील दोन दिवसांपासून गणरायाचे स्वागत करण्यासाठी बाजारपेठा सजल्या होत्या आणि आज प्राणप्रतिष्ठा केली जाते आहे. त्यामुळे गणेश मूर्ती खरेदीची लगबग सकाळपासून आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी