उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयात रात्री उशिरा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी योगेश मिश्रा याला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. घटनास्थळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळातच ही घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. RNO












