मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. ते आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार असून त्याच पार्श्वभूमीवर धुळ्यातून शेकडो मराठा आंदोलक रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही व आमच्या इतर मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत आमचे हे आंदोलन चालूच राहील अशी ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी यावेळी घेतली आहे.