मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आज पहाटे 5 वाजता मुंबई येथील आझाद मैदानात पोहोचले आहेत. त्यांनी याठिकाणी पोहोचताच मोठी गर्जना केली. यावेळी ते म्हणाले, कोणीही जाळ पोळ करू नका, आंदोलनाला बट्टा लायचा नाही, मी मरण पत्करायला तयार आहे. पण आता मागे हटायचं नाही.. दारू पिऊन धिंगाणा घालू नका, माझ्या समाजाला खाली मन घालावी लागेल असे वागू नका असेही ते म्हणाले.