नंदुरबार जिल्हयातील घडणाऱ्या गंभीर गुन्हयांचा तात्काळ व अचूक तपास होणेसाठी राज्य शासनाकडून जिल्हा पोलीस दलासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलात या वाहनाच्या समावेशामुळे जिल्हयात घडणाऱ्या गुन्हयांचे घटनास्थळी तात्काळ पोहोचून भौतिक, रासायनिक, जैविक तसेच डिजीटल पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. यामुळे गुन्हेगारांवर कारवाईसाठी व न्यायप्रक्रियेसाठी आवश्यक भक्कम पुरावे मिळणे शक्य होणार आहे.