महाडमधील रोहिदास तरुण मंडळ आणि कोहिनुर मित्र मंडळाने यंदा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा देखावा साकारला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 नागरिकांचा बळी गेला होता. भारतीय सैन्याने 6-7 मे रोजी “ऑपरेशन सिंदूर” राबवून दहशतवाद्यांचा नायनाट केला होता. याच थीमवरून देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळांनी केला आहे.