मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यातून मदतीचा ओघ वाढला आहे. खाऊ गल्ल्या बंद असल्याने आंदोलकांना गैरसोय होत असून, जिल्ह्यातून भाकरी, लोणचे, ठेचा, पिठलं, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर पाठवल्या जात आहेत. यामध्ये हॉटेल तिरंग्याचे मालक लक्ष्मण भोसले यांच्याकडूनही अन्नसाहाय्य पाठवण्याची घोषणा करण्यात आली आहे.