मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण सुरू असून राज्यभरातून लाखो मराठा बांधव आंदोलनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र एवढ्या मोठ्या गर्दीला सामोरं जाण्यासाठी महानगरपालिकेकडून कोणतीही विशेष सोय करण्यात आलेली नाही. पाणी, शौचालयं, स्वच्छता किंवा जेवणाची सोय नसल्याने आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरच आंघोळ, स्वयंपाक आणि जेवण करावं लागत आहे. महिलांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.












