ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या बनावट जात प्रमाणपत्रधारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आरक्षणातील घुसखोरी थांबवावी, या मागणीसाठी सिंदखेड राजा येथे डॉ. प्रवीण तायडे यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळावा आणि खऱ्या पात्रांना आरक्षणाचा लाभ मिळावा, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे इतर समाजातील लोक आरक्षणाचा लाभ घेत असल्याने खऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे हक्क हिरावले जात आहेत.