मुंबई येथे सुरु असलेल्या मराठा आरक्षणादरम्यान आंदोलकांनी जुहू बस स्थानक येथे उभी असलेल्या बसमध्ये घुसून प्रवाशांना मारहाण करत बसच्या खिडक्यांची काच देखील फोडली. वाद होत असल्याचा आवाज आल्याने प्रवर्तक आणि कर्मचारी बसमध्ये जाऊन त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु मराठा आंदोलक हुज्जत घालतच होते, त्यानंतर पोलीस मदत क्रं. 100 तक्रार देऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले.












