मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका सलग चौथ्या दिवशी रेल्वे प्रवाशांना बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना शांततापूर्ण आंदोलनाची परवानगी दिली असताना रेल्वे स्थानक परिसरात गोंधळ उडाला. CSMT स्थानकावर आंदोलकांनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण झाल्या आहेत.