मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला महिलांकडून पाठिंबा, म्हणुन महिलांनी साजरा केला नाही महालक्ष्मींचा सण
राज्यभरात गौराई अर्थात महालक्ष्मींचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील उमरी गावातील महिलांनी गौराईचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उमरी या गावातून अनेक मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबई येथे गेले आहेत. आमची माणसं मुंबई येथे चार दिवसापासून उपाशी आहेत, आमच्या लेकरा बाळांची मुंबई येथे गैरसोय होत आहे. त्यामुळे आम्ही महालक्ष्मीचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे महिलांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या गावातील महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत.