बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला हाके समर्थकांकडून दुग्धभिषेक घालण्यात आला. राज्यात वारंवार लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ले होण्याचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच बीडच्या गेवराई येथे तर काल देखील पुण्यात त्यांच्यावर हल्ला झाला होता. याच घटनेचा निषेध करत ओबीसी समाजाने राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारवाडी फाटा येथे हाके यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक घातला आहे.