पुण्याहून पुसदकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमध्ये एका 50 वर्षीय प्रवाशाने पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बसमध्ये जाळण्याचा वास आल्याने घटना लक्षात आली, तेव्हा प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या घटनेत त्या प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला. ते बुलढाणा जिल्ह्यातील आरेगाव गावचे रहिवासी होते. पोलीस पुढील तपास करत आहेत.