उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणीच्या साखरपुडा विधीच्या दरम्यान तिच्या मामानं तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी मामा या हल्ल्यानंतर पळून गेला, परंतु पोलिसांच्या चकमकीत त्याला पायात गोळी लागली आणि त्याला अटक करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, तर पोलीस तपास सुरू आहे.