आज सोमवार असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई येथील अति मुसळधार पावसाने प्रवाशांची दैना केली आहे. मध्यरात्री पासून संपूर्ण महाराष्ट्रात संततधार सुरु असून मुंबईला तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काही काळाच्या विश्रांतीनंतर संपूर्ण महाराष्ट्र जलमय झाले असून पावसाचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. मुंबई सह हवामान खात्याने काही ठिकाणी येल्लो अलर्ट तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यानुसार हवामान खात्याने दिलेल्या अलर्ट नुसार मुंबई महानगर प्रदेशात 3 तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहरासह विविध ठिकाणी मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली असून सकाळच्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांची दैना झाल्याचे बघायला मिळत आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यात रेड अलर्ट आणि पावसामुळे शासकीय आणि खाजगी शाळांना सुट्टी जरी करण्यात आल्या आहे. या पावसामुळे उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मुंबई प्रशासनाने गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे अशा सूचना दिल्या असून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यासह बुहन्मुंबई महापालिकेच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहे.
मुंबई जिल्ह्यासह पुणे आणि रायगड या जिल्ह्यात देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई येथील लोकल ला देखील या अति मुसळधार पावसाचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मध्य वेस्टर्न आणि हार्बर लाईनवर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने लोकल ट्रेन उशिराने धावत आहे.