Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Mumbai
  • IAS Pooja Khedakar News : नवी मुंबईत ट्रक अपहरण प्रकरणात खेडकरांचा हात? काय आहे नेमकं प्रकरण
Mumbai

IAS Pooja Khedakar News : नवी मुंबईत ट्रक अपहरण प्रकरणात खेडकरांचा हात? काय आहे नेमकं प्रकरण

सध्या राज्यभर IAS पूजा खेडकर प्रकरण जोरदार गाजत आहे. बनावट अपंगत्व प्रमाणपत्र आणि आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी २०२३ बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्यात आले. त्यांचे वडिल म्हणजे दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण विभागात आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांच्या आई म्हणजे मनोरमा खेडकर, त्या भालगावच्या नामनिर्देशित सरपंच होत्या.

बडतर्फ IAS पूजा खेडकरांविरुद्ध अनेक आरोप आणि काही वादग्रस्त मुद्दे आहेत. पूजा खेडकरांनी अपंगत्व प्रमाणपत्र (Disability Certificate) आणि आरक्षणाचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी “व्हिज्युअली इम्पेअर्ड” प्रवर्गात येणारं प्रमाणपत्र दाखवून UPSC परीक्षेत उपस्थिती नोंदविली आणि त्यांच्यावर त्यानुसार विशेष सवलती मिळवल्या असल्याचा त्यांच्यावर दावा करण्यात आला असून खेडकर यांनी वैद्यकीय तपासणीत काही वेळा उपस्थिती टाळली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, OBC (Non-Creamy Layer) प्रमाणपत्राबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. त्यांच्या OBC प्रमाणपत्राची वैधता नाशिक विभागीय आयुक्तांकडून रद्द करण्यात आली असून पूजा खेडकर यांनी त्यावर म्हणजेच कुटुंबाने दावा केला की हे रद्दीकरण दबावाखाली करण्यात आले आहे.

पूजा खेडकर यांनी UPSC निवड प्रक्रियेत गैरप्रकार असल्याचा आरोप करून काही तथ्ये आणि कागदपत्रे खोटी असावी, ज्यामुळे त्यांना निवड प्रक्रियेत इतर उमेदवारांपेक्षा अन्यायकारक फायदा झाल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात पूजाने सर्वोच्च न्यायालयातून अभय मिळवला आहे. त्यांनी म्हटले आहे की हे आदेश त्यांच्या बाजू योग्य असल्याचे दाखवतात आणि माध्यमातील नकारात्मक प्रचार चुकीचा आहे. त्यांनी UPSC (Civil Services Examination) मध्ये अपंगत्व आणि OBC कोटा वापरून काही “extra attempts” परवानगीपेक्षा जास्त परीक्षा देण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे. तसेच, त्यांचे नाव IAS प्रत्येकी केस मध्ये शिफारस झाल्यानंतर UPSC ने त्यांच्या उमेदवारी रद्द केली असून भविष्यातील परीक्षा देण्यापासून त्यांना तात्पुरती थांबवले आहे.

यासगळ्या प्रकरणानंतर अलीकडे, नवी मुंबईमध्ये ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार या व्यक्तीचा अपहरण झाला होता. रोडवर एका सिमेंट मिक्सर ट्रक व लँड क्रुझर या वाहनांमध्ये अपघात झाला आणि त्यानंतर ट्रक हेल्परला जबरदस्तीने कारमध्ये नेले गेले. ही कार पुढे पुण्यातील बाणेर भागात, दिलीप खेडकर यांच्या बंगल्याबाहेर आढळली. हे बंगला पूजा खेडकर यांच्या वडिलांची मालकीचा आहे. पोलिसांनी दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला, तसेच पोलिसांवर कुत्रे सोडल्याचा आरोप केला जात आहे. काही वेळानंतर अपहरण झालेला प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या ताब्यात आनले गेले. दिलीप खेडकर हे ह्या प्रकरणात फरार आहेत.

पूजा खेडकर यांच्यावर अन्य आरोप जसे की त्यांच्या प्रशिक्षण काळात पुण्याहून स्थानांतरीत करण्यात आले असता पोस्टिंग दरम्यान काही “अनधिकृत मागण्या” केल्या असल्याचाही आरोप आहे. उदा. कार, स्टाफ व कार्यालयासाठी वगैरे. याशिवाय, त्यांनी सरकारी गाडीवर “बीकॉण” बसवला असल्याचा, सरकारी प्रतीकं (state insignia) वापरल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू आहे; अनेक तपास कार्यालये समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे OBC प्रमाणपत्राच्या रद्दीकरणाबाबत त्यांनी अपील केली आहे. तसेच, पूजा खेडकर यांना न्यायालयाने अभय दिले असल्याने अटक होण्यापूर्वी तात्काळ संरक्षण मिळाले. पण आरोपांच्या सत्यतेची तपासणी करणे अजून बाकी आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts