जालन्यातील अंबड मतदार संघाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी शिवसेना (उ.बा.ठा) गटाला रामराम ठोकत काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर चोथे हे कुणाचा झेंडा हाती घेणार याविषयी राजकीय चर्चेला चांगलंच उधाण आलं होतं आणि अखेर शिवाजीराव चोथे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे.
माजी आमदार शिवाजीराव चोथे हे जवळपास 40 वर्षापासून शिवसेनेमध्ये होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिले जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या पंचवीस वर्षे त्यांनी या पदावर काम केले होते. त्यानंतर 1995 मध्ये देखील ते अंबड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आलेले होते.यादरम्यान 1999 आणि 2004 मध्ये ही त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली गेली होती,परंतु त्यांचा पराभव झालेला होता.मागील घनसावंगी विधानसभा निवडणूक मध्ये देखील ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते मात्र त्यांना त्यात यश आलं नाही.
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवाजीराव चोथे यांनी शिवसेना(उ.बा.ठा)राजीनामा दिलेला होता.आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये(अजित पवार गट)जाण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज जाहीर प्रवेश सोहळा छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केला आहे.त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.