भारतामध्ये नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार असून ज्यामुळे अनेक वस्तूंच्या किमतीत घट होणार आहे. नवी दिल्ली येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना नवरात्रीच्या पूर्वसंध्येला एक महत्त्वाची घोषणा केली. या बदलांमुळे ग्राहकांना रोजच्या वापरातील वस्तूंवर सवलत मिळणार तर आहे. परंतु, जुन्या वस्तूंवरही सवलत मिळणार का? याबद्दल नागरिकांमध्ये शंका आहेत.
सरकारने १२% आणि २८% स्लॅब रद्द करून ५%, १८% आणि ४०% स्लॅब लागू केले आहेत. आता देशात केवळ ५ आणि १८ टक्के जीएसटी लागू होणार असल्याने अनेक वस्तू स्वस्त होतील आणि ग्राहकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. या नव्या जीएसटी दरामुळे दूध, तूप, लोणी, पनीर, गोड पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घरगुती उपकरणांच्या किमती कमी होणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देशात जीएसटी बचत उत्सव सुरु होत असून या उत्सवात ग्राहकांची बचत वाढेल आणि ते आपल्या आवडत्या वस्तू अधिक सोप्या पद्धतीने खरेदी करावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. त्याचीच अंमलबजावणी अमूलने करत ७०० पेक्षा जास्त उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत, ज्यात तूप ₹४० स्वस्त झाले आहे
तसेच, कर्नाटका मिल्क फेडरेशनने सुद्धा दुग्ध पदार्थाच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, जुन्या वस्तूंवर नवीन जीएसटी दर लागू न होता २२ सप्टेंबरपूर्वी तयार केलेल्या वस्तूंवर जुन्या जीएसटी दर लागू होतील असे आदेश केंद्र सरकारने दिले. दुकानदारांना जुन्या वस्तूंवर नवीन जीएसटी दर लागू करण्यासाठी नवीन स्टिकर्स लावण्याची गरज नाही कारण हे निर्णय व्यवसायांना ऑपरेशनल अडचणी कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना सुस्पष्टता प्रदान करण्यासाठी घेतले असल्याचे सरकारने सांगितले.
जीएसटी २.० चा फायदा :
याचा फायदा देशातील गरीब, मध्यमवर्गीय, तरुण, शेतकरी, महिला, दुकानदार आणि व्यापारी सर्वांसाठी असेल. या निर्णयामुळे भारताचा विकास आणखी गती घेईल, गुंतवणूक वाढेल, कारभार सोपा होईल आणि प्रत्येक राज्य विकासाच्या स्पर्धेत बरोबरीने सहभागी होईल या मागचा मुख्य हेतू असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री यांनी सांगितले. ग्राहकांनी जुन्या वस्तू खरेदी करताना त्यावर लावलेले स्टिकर्स किंवा प्रिंट तपासून नवीन जीएसटी दर लागू आहेत की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. जर जुन्या दरानुसार स्टिकर असेल, तर ग्राहकांना नवीन दरानुसार सवलत मिळेल.
केंद्र सरकारचा मुख्य उद्देश :
नागरिकांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन सरकारने केले आहे. स्वदेशी वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य दिल्याने आपला भारत आत्मनिर्भर होईल. यामुळे देशातील उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगारनिर्मितीला देखील मोठा हातभार लागेल. नव्या जीएसटी दरांमुळे केवळ ग्राहकांच्याच नव्हे तर व्यापाऱ्यांच्याही अडचणी कमी होतील. वस्तूंच्या किंमती कमी झाल्याने विक्री वाढेल, त्याचा थेट फायदा उद्योग आणि रोजगार क्षेत्राला होईल. नवरात्रीसारख्या मोठ्या सणासुदीच्या काळात हा दिलासा मिळाल्याने बाजारपेठा चैतन्यमय होणार असून हा निर्णय आत्मनिर्भर भारतासाठी एक मोठं पाऊल असल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे.
कोणत्या वस्तुंना किती दराने कर आकारल्या जाणार :
टूथपेस्ट, साबण, शॅम्पू यांसारखे FMCG – १२ टक्के दर कर
बिस्किटे, स्नॅक्स, ज्यूस, तूप आणि लोणी यांसारखी पॅकेज्ड उत्पादने – ५ टक्के दर कर
सायकल, स्टेशनरी वस्तू, कपडे आणि चप्पल देखील स्वस्त
मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स – १८ टक्के दर कर
एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, डिशवॉशर आणि टीव्ही यांसारख्या घरगुती उपकरणे – १८ टक्के दर कर
मात्र, जीएसटी २.० लागू केल्याने काही गोष्टी महाग झाल्या आहेत त्यांमध्ये ‘पापी वस्तू’ चा समावेश आहे; त्यामध्ये तंबाखू उत्पादने, अल्कोहोल, पान मसाला, ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग प्लॅटफॉर्मवर ४० टक्के दर कर लागू केले असून पेट्रोल आणि डिझेल यांवर अजूनही दरांमध्ये कोणताही बदल केले गेले नाहीत. परंतु, हिरे आणि इतर लक्झरी वस्तूंवरही जास्त कर आकारले जातील.