नवी मुंबईमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होणार असून या प्रदेशासाठी हा महत्वाचा प्रकल्प ठरू शकतो. या प्रकल्पामुळे मुंबईच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक मोठा नवा अध्याय सुरू होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प ९४% पूर्ण झाले असून 30 सप्टेंबर पासून प्रवाशांच्या वापरात येईल. या प्रकल्पाच्या उर्वरित कामांमध्ये बाह्य फिनिशिंग, बॅगेज सिस्टीम, धावपट्टीचे काम आणि आधारभूत पायाभूत सुविधा यांसारखी काही कामे शिल्लक असल्याने त्याच्या कामाला वेग आला असल्याचे प्रशासनाने सांगितले.
नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक आणि स्मार्ट सुविधापूर्ण असतील. यामध्ये प्रवाशांच्या बॅगेज 360 डिग्री बारकोड स्कॅनिग प्रणाली वापरण्यात आली आहे, ज्यामुळे बॅगेज हाताळणं जलद आणि सोपं होईल. मुंबईच्या सध्याच्या विमानतळापेक्षा या आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता अधिक आहे. तसेच, 37 मेगाहर्ट्झ ग्रीन झोनने विमानतळ सुसज्ज आहे. या ठिकाणी ग्रीन लेव्हल एअरपोर्टची संकल्पना राबवण्यात येत आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षमतेवर भर दिला जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA ) पहिल्या टर्मिनलने सुरुवात केल्याने ज्यावरून दरवर्षी अंदाजे २० दशलक्ष प्रवासी प्रवास करतील. नंतरही कालांतराने प्रवाशांची संख्या वाढेल. या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबईच्या विद्यमान विमानतळावरील ताण थोडा कमी होईल आणि प्रवाशांना अधिक पर्याय मिळतील.
नवीन विमानतळाची संरचना :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे क्षेत्रफळ सुमारे १,१६० हेक्टर असून मुंबईच्या सध्याच्या मुख्य विमानतळापेक्षा अधिक मोठे आहे. पहिल्या टप्प्यात एक टर्मिनल सुरू होणार असून ज्याची वार्षिक क्षमता २० दशलक्ष प्रवाशांची आहे. NMIA च्या रचनेत कमळाच्या फुलाचा आकार प्रेरणा म्हणजेच ज्यात नैसर्गिक प्रकाश आणि हरित तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी आधुनिक चेक-इन झोन, जलद बॅगेज हँडलिंग प्रणाली, आरामदायक लाऊंज, फूड कोर्ट्स, रिटेल झोन आणि हरित ऊर्जा वापर यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील.
वाहतूक सुलभतेसाठी, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतू आणि सायन-पनवेल महामार्गासह विविध प्रमुख रस्ते विमानतळाशी जोडण्यात येत आहे. याशिवाय, पुणे, ठाणे, दादर, वाशी, पनवेल इत्यादी प्रमुख केंद्रांहून विमानतळासाठी विशेष बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. विमानतळाची धावपट्टी सुमारे ३,७०० मीटर लांब असून प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार असून चार टर्मिनल आणि दोन समांतर धावपट्टी बांधण्याची योजना आहे. ज्यामुळे दरवर्षी तब्बल ९० दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकतील.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुविधा :
1. नवी मुंबई विमानतळ चारही दिशांना प्रवाशांसाठी मेट्रो, रेल्वे यांसारख्या वाहतुकींशी सोय
2. बॅगेज चेक-इन सुविधा शहरातच उपलब्ध असल्याने विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच बॅगेज चेक-इन
3. अंडरग्राऊंड मेट्रोमुळे पायी प्रवास बंद
4. आरामदायक लाऊंज, फूड कोर्ट्स, रिटेल झोन आणि हरित ऊर्जा वापर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमुळे मुंबई महानगर प्रदेशातील विमानसेवा अधिक सुलभ आणि कार्यक्षम होईल, तसेच प्रवाशांना आधुनिक आणि स्मार्ट सुविधा उपलब्ध होतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमुळे मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल, तसेच प्रवाशांना आधुनिक आणि सुलभ विमानसेवा उपलब्ध होईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रेल्वेसेवा :
1. पनवेल स्टेशन एनएमआयएमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे
2. मेट्रो लाईन 8 म्हणजेच CSMIA-NMIA जोडणारी. तसेच, आसपासच्या उपनगरांना जोडण्यासाठी इतर लाईन्सची योजना
एनएमआयए हे अदानी ग्रुप त्यांच्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जद्वारे ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून विकसित करण्यात येत आहे. तसेच, प्रकल्पात जमीन, कनेक्टिव्हिटी आणि नियोजन यासाठी राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा सहकार्य समाविष्ट आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर इंडिगो आणि अकासा एअर उड्डाणे सुरू करण्यात येणार आहे. इंडिगोचे १५ हून अधिक देशांतर्गत शहरांमध्ये दररोज सुमारे १८ उड्डाणे सुरू होणार आहेत. मार्च २०२६ पर्यंत आंतरराष्ट्रीय मार्गांचा समावेश करून त्यांची संख्या वाढवण्याची उपाययोजना सुरु आहेत. नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवून टर्मिनल २ आणि अतिरिक्त टप्पे (टर्मिनल ३ आणि ४, दुसरा धावपट्टी) पुढील वर्षांत सुरू होतील; टर्मिनल २ आर्थिक वर्ष २०२८-२९ च्या आसपास होण्याची शक्यता आहे.