अमेरिकेतील आघाडीची सल्लागार कंपनी एक्सेंचर ही सध्या चर्चेत आहे. कारण या कंपनीने AI संबंधित व्यवसाय सुधारणा आणि कौशल्य विकास या विषयावर सहा महिन्यांचा व्यवसाय ऑप्टिमायझेशन प्रोग्राम सुरु केला आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जलद अवलंब आणि ग्राहकांच्या मागणीत घट झाल्याने या कंपनीने तीन महिन्यात 11 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या अहवालानुसार, एआय जास्तीत जास्त वापरात आणण्यासाठी आणि ग्राहकांच्या कॉर्पोरेट मागणीत घट या कारणाने कंपनीतील कर्मचाऱ्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. याबाबत अॅक्सेंचरच्या सीईओ जूली स्वीट यांनी सांगितले की, या कर्मचाऱ्यांना पुन्हा कौशल्य देण्यापेक्षा आणि काही गोष्टीमुळे नोकरीतून निलंबित करणे हा एक व्यवहार्य पर्याय आहे. घेण्यात आलेला हा निर्णय $865 दशलक्ष पुनर्रचना कार्यक्रमातील एक महत्वपूर्ण भाग आहे.
अॅक्सेंचर कंपनीच्या 7000,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना एजंटिक AI मध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. “तंत्रज्ञानाच्या प्रत्येक नवीन लाटेत एक टाइम असतो, जेव्हा तुम्हाला प्रशिक्षण द्यावे लागते, अॅक्सेंचरची मुख्य क्षमता म्हणजे ते मोठ्या प्रमाणात हे करण्यास सक्षम आहे.” असे अॅक्सेंचरच्या सीईओ जूली स्वीट यांनी सांगितले. AI ची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि ग्राहकांच्या बदलत्या मागणीनुसार कंपनीला व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना बाहेर काढले मात्र या कंपनीने कर्मचार्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी देखील भर दिला आहे.
कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनी भविष्यातील डिजिटल ट्रेंड आणि AI-आधारित व्यवसायासाठी सज्ज राहील. रणनीती, रचना, कामाची पद्धत आणि कामगिरी मोजण्याची पद्धत यांचा समन्वय करत व्यवसाय सुधारणा केल्यास ग्राहकांना अधिक मूल्य मिळेल. तसेच कर्मचार्यांचे कौशल्य वाढवणे, पुनर्रचना करणे आणि व्यवसाय अधिक कार्यक्षम बनवणे या सर्व गोष्टी संतुलित करणे गरजेचे आहे.