विष्णुपंत शिरोमणी म्हणून ओळखल्या जाणारे आचार्य चाणक्य हे महान अर्थशास्त्रज्ञ आणि कुटणीतज्ञ होते. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच संग्रहांचे लिखाण केले आहे. या संग्रहांपैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. शास्त्र या संग्रहामध्ये दिलेल्या नेत्यांचे पालन केल्यास प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. कारण त्यांनी सांगितलेल्या नीती या फक्त चूक बरोबर नसतात तर काही निर्णय घेण्यासाठी मदत करतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तींना मदत करणे योग्य आहे. आणि मदत केलीच पाहिजे. पण तू बऱ्याचदा आपण अशा व्यक्तींची मदत करतो ज्यांच्यामुळे आपल्याला जीवनभर पश्चाताप करावा लागतो. जाणून घेऊया आजच्या चाणक्यनीति मध्ये आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही नीती.
मूर्खाशिष्योपदेशन दृष्टास्त्रीभरणेन च| दुःखीते सम्प्रयोगेन पंडितोप्यवसीदती
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या श्लोकानुसार, जीवनात काही लोकांची मदत कधीच केली नाही पाहिजे. आपण बऱ्याचदा चांगल्या भावनेने इतरांची मदत करत असतो. परंतु बऱ्याचदा मदत केल्यानंतर आपल्याला पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे इतरांची मदत करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.
नशा करणाऱ्या व्यक्तींना करू नका मदत
आचार्य चाणक्य यांच्या मते, जे व्यक्ती सतत नशेमध्ये असतात. किंवा ज्या व्यक्तींना नशा करण्याची सवय असते. अशा व्यक्तींना कधीच मदत करू नये. नशा करणारे व्यक्ती जर तुमच्याकडे मदत मागत असतील तर नकार देणे योग्य आहे. नशा करणारा व्यक्ती नशेमध्ये सर्व काही विसरून जातो. आणि आपण पैशांच्या केलेली मदत देखील विसरतो. असे लोक नशे मध्ये कोणालाही हानी पोहोचवू शकतात. असे व्यक्ती नशेमध्ये योग्य आणि अचूक या गोष्टींचा विचार करू शकत नाही. त्यामुळे नशेमध्ये असणाऱ्या व्यक्तींना कधीच मदत करू नये.
चारित्र्यहीन व्यक्तींना करू नये मदत
ज्या व्यक्तींचे चरित्र खराब आहे अशा व्यक्ती पासून लांब राहणे गरजेचे असते. आणि अशा व्यक्तींची मदत करणे देखील टाळले पाहिजे. चारित्र्यहीन व्यक्तींची मदत केल्यामुळे तुम्ही स्वतः संकटात पडू शकतात. त्याचबरोबर अशा व्यक्तींच्या संपर्कात राहिल्यामुळे समाज आणि परिवारामध्ये व्यक्तींना अपमानित व्हावे लागते. त्यामुळे चारित्र्यहीन व्यक्तींना कधीच मदत करू नये. आणि त्यांच्याशी संबंध ठेवू नये.
सतत दु:खी राहणारे व्यक्ती
चाणक्य नितीनुसार, आयुष्यामध्ये बरेच व्यक्ती हे कधी सुखी राहत नाही. ते सतत दुःखी राहतात. अशा दु:खी राहणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहणे गरजेचे आहे. दुःखी व्यक्तींची मदत केल्यामुळे तुम्हाला देखील दुःख मिळू शकते. असे व्यक्ती जीवनात कितीही चांगले केल्यानंतर देखील दुःखीच राहतात. त्याचबरोबर सतत दुःखाचा सामना करणारे व्यक्ती इतरांचे सुख पाहून त्यांच्या सुखाला नजर लावतात. त्यामुळे नजर लावणाऱ्या आणि विनाकारण दुखी राहणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहण्यातच सुख आहे.