स्वतःचा व्यवसाय करणं हे प्रत्येकाला आवडत असतं. पण त्यामध्ये होणारा लॉस यामुळे बरेच जण व्यवसाय करायला घाबरतात. पण जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही शेती सोबतच अजुन काही व्यवसाय करु शकतात. ज्यातून तुम्हाला बंपर कमाई होईल आणि सरकारकडून मदत देखील मिळेल. यासाठी तुम्हाला शहरात जाण्याची किंवा शेती सोडून दुसरे काम शोधण्याची गरज नाही. तर शेती सोबतच तुम्ही हा व्यवसाय करू शकतात. यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो. हा व्यवसाय म्हणजे पोल्ट्री फार्म. पोल्ट्री फार्मचा बिझनेस सुरू करण्यासाठी जास्त खर्च लागत नाही. तुम्ही सुरुवातीला चाळीस-पन्नास हजार रुपये गुंतवून देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला या बिझनेस साठी कोठेही जागा घेण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरीच फार्मिंग हाऊस सुरू करू शकतात.
या जागेवर सुरू करा व्यवसाय
पोल्ट्री फार्म साठी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात, किंवा शेतामध्ये हा बिजनेस करू शकतात. या बिझनेस मध्ये कोंबड्यांचे पालन पोषण करून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला योग्य कोंबडीची निवड करता आली पाहिजे. जर तुम्ही चांगला नफा कमव इच्छित असाल तर कडकनाथ, ग्रामप्रिया, स्वर्णनाथ, केरी शामा, निर्भिक, श्रीनिधी, वनराजा, कारी उज्वल आणि कारी यासारख्या जातींच्या कोंबड्या पाळण्याकडे भर द्यावा लागेल.
पोल्ट्री फार्म च्या माध्यमातून सुरू केलेल्या बिझनेस मधून तुम्हाला दुप्पट पैसा मिळू शकतो. कोंबडीने घातलेली अंडी तुम्ही विकू शकतात. एक देशी कोंबडी साधारणपणे 160 ते 180 अंडे वर्षाला घालते. जर तुमच्याकडे जास्त कोंबड्या असतील तर तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात अंडे उपलब्ध होतील. यातून तुम्ही अंडी विकून दरवर्षी लाखो रुपयांपर्यंत कमाई करू शकतात. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात तुम्ही कोंबडीचे चिकन देखील विकू शकतात. यातून तुम्हाला प्रचंड नफा मिळू शकतो. हा नफा गुंतवणुकीपेक्षा दुप्पट देखील होऊ शकतो. परंतु यासाठी तुम्हाला पन्नास हजार रुपयेगुंतवणूक करावी लागेल. चिकन विकल्या नंतर वेळेनुसार तुम्हाला दुप्पट पैसे मिळू शकतात.
सरकार देते एवढी मदत
यासाठी सरकारकडून देखील मदत करण्यात येते. जर तुम्ही हा बिजनेस सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारकडून मदत दिल्या जाते. पोल्ट्री फार्म या बिझनेस मुळे ग्रामीण आर्थिक विकास वाढू शकतो. त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ही मदत करत असते. यासाठी सरकार आवश्यक आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण प्रदान करते. त्यामुळे नागरिकांचा या बिझनेस कडे कल वाढू शकतो. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या माध्यमातून सबसिडी देण्यात येते. या सबसिडीच्या माध्यमातून तुमच्या खर्चाचे 50% कव्हर करते. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यांच्याकडून देखील कुक्कुटपालनासाठी सबसिडी दिली जाते. त्याचबरोबर बऱ्याच वित्तीय संस्थांकडून तुम्हाला पोल्ट्री उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देखील मिळू शकते. या बाबत तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत राष्ट्रीय पशुधन पोर्टलला भेट देऊ शकतात.