विष्णुपंत शिरोमणी म्हणजेच आचार्य चाणक्य हे राजनीति शास्त्रज्ञ होते. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच संग्रहांचे लिखाण केले असून नीतीशास्त्र हा संग्रह अत्यंत प्रसिद्ध आहे. या संग्रहाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करतात. त्यांनी सांगितलेल्या नीती या आयुष्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये कामात येऊ शकतात. आचार्य चाणक्य यांच्या नीती आचरण्यात आणल्यास प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशस्वी होईल. आचार्य चाणक्य हे, वैवाहिक जीवन, यशस्वी होण्यासाठीचे काही मुद्दे यासारख्या बऱ्याच गोष्टींवर मार्गदर्शन करत असतात. आजच्या चाणक्य नीति मध्ये त्यांनी तीन अशा चुकांबद्दल सांगितले आहे ज्यामुळे मुलांचे नुकसान होऊ शकते.
मुलांचा सांभाळ करणे आणि त्यांना चांगले संस्कार लावणे हे सोपं काम नाही. लहान मुलं हे लहानपणीच आई-वडिलांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून शिकत असतात. आणि त्याचवेळी त्यांना संस्कार येणाऱ्या काळासाठी तयार करणे गरजेचे आहे. आई वडील ज्याप्रमाणे एखाद्या मुलासमोर वागतील त्याचप्रमाणे लहान मुलं देखील वागत असतात आणि त्यातूनच शिकत असतात. त्यामुळे आई-वडिलांनी देखील त्यांच्यासमोर व्यवस्थित वागले पाहिजे. परंतु बऱ्याचदा आई-वडील अशा काही चुका करतात, ज्यामुळे भविष्यात मुलं देखील त्याचप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात आणि आई-वडिलांनी केलेल्या चुका पुन्हा करतात. आचार्य चाणक्य यांनी आजच्या नीती मध्ये या काही चुकांबद्दल भाष्य केले आहे. ज्यामुळे मोठे नुकसान होते.
कडू भाषा
बऱ्याचदा आई-वडील मुलांसमोर चुकीच्या भाषेचा प्रयोग करतात. आणि कठोर भाषा देखील बऱ्याचदा मुलांसमोर वापरली जाते. परंतु यामुळे मुलं देखील कठोर भाषेत बोलायला लागतात. त्यामुळे कोणासोबत देखील बोलताना आई-वडिलांनीच नाही तर प्रत्येक व्यक्तीने मधुर भाषा बोलली पाहिजे. आपल्या भाषेने आपण दुसऱ्यांना जिंकून घेऊ शकतो. आणि आई वडिलांची भाषा मधुर असेल तर मुलं देखील मधुरच बोलतात. यासोबतच बरेच आई वडील मुलांसमोर अपशब्द वापरतात. परंतु याचा परिणाम मुलांवर लगेच होतो आणि मुलं कॉपी करत इतरांवर अपशब्द वापरतात. म्हणून कधीही आई-वडिलांनी मधुर भाषेत बोलले पाहिजे. आणि अपशब्द टाळले पाहिजे.
खोटं बोलणे
जर आई-वडील एखाद्या व्यक्तीला मुलांसमोर खोटे बोलत असतील तर त्याचा परिणाम मुलांवर लगेच पडतो. ज्यामुळे मुलं देखील खोटे बोलायला लागतात. आई-वडिलांकडूनच मुले शिकत असतात. त्यामुळे आई वडील खोटं बोलत असतील तर मुलं देखील त्याच वळणावर जातात. त्यामुळे कधीच आई-वडिलांनी खोटे बोलू नये. आणि मुलांसमोर योग्य वागणूक ठेवल्यास मुलं देखील चांगल्या वागणुकीत वाढतात. लहान मुलांना खोटं बोलण्याची सवय लागली तर ही अत्यंत भयानक सवय बनवू शकते.
अपमान करणे
आई-वडिलांनी फक्त मुलांसमोरच नाही तर सतत सन्मानपूर्वक राहिले पाहिजे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना मान दिला पाहिजे. जेणेकरून यातून मुलं देखील तुमचा व्यवहार बघून सन्मान देतील. परंतु तुम्ही इतर व्यक्तींचा अपमान करत असाल तर मुलं देखील तेच शिकून इतर मोठ्या व्यक्तींचा आणि लहान यांचा अपमान करतील. त्यामुळे मुलांसमोरच नाही तर इतर वेळी देखील मोठ्यांचा सन्मान करणे आणि प्रत्येक व्यक्तीला मान देणे गरजेचे आहे.