आचार्य चाणक्य जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच संग्रहांचे लिखाण केले आहे. या संग्रहांपैकी नीतिशास्त्र हा एक संग्रह लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना गरजेचा आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्र या संग्रहात काही सक्सेस मंत्र सांगितले आहेत. जेणेकरून तुम्ही तणाव मुक्त राहू शकतात. आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ येताच स्ट्रेस लेवल वाढते. अशावेळी अभ्यासासोबत क्लासमध्ये चांगला स्कोर मिळवण्यासाठी विद्यार्थी धावपळ करतात. परंतु बऱ्याचदा तणावामुळे चांगला स्कोर विद्यार्थी करू शकत नाही. अशावेळी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले सक्सेस मंत्र कामात येऊ शकतात. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होईल.
आचार्य चाणक्य सांगतात की, विद्यार्थी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने एक ध्येय समोर ठेवून शिक्षण घेतले पाहिजे. परंतु त्यासाठी मेहनत घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते. आणि यामुळे अभ्यास आणि ध्येयावरून लक्ष विचलित होते. त्यामुळे यशस्वी होताना अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी आणि परीक्षेवेळी सोशल मीडिया मोबाईल पासून लांब राहिले पाहिजे. जेणेकरून परीक्षेत चांगला स्कोर करता येईल.
शिस्त
जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःला शिस्त लावणे गरजेचे आहे. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त असणे अति महत्त्वाचे आहे. मुलांना कोणत्याही गोष्टीची लागलेली शिस्त ही यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते, प्रत्येक विद्यार्थ्यांनी झोपण्याचा, अभ्यासाचा, दैनंदिन कार्याचा वेळ निश्चित केला पाहिजे. जेणेकरून योग्य वेळी योग्य सवय लागेल.
टाईम टेबल
परीक्षेवेळी जर तुम्ही लगातार अभ्यास करत असाल तर लवकर बोर होऊ शकतात. त्यामुळे अभ्यास करताना थोडाफार ब्रेक घेणे गरजेचे आहे. जेणेकरून अभ्यासात मन लागेल. आणि विद्यार्थी फ्रेश राहतील. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना टाईम टेबल फिक्स करणे गरजेचे आहे. या टाईम टेबल नुसार प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यासाला बसू शकतो. आणि दिलेल्या वेळेत ब्रेक घेऊ शकतो. जेणेकरून अभ्यास देखील होईल आणि अभ्यास करताना बोर होणार नाही.
आळस
प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये पास होण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. यासोबतच आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी आजचे काम उद्यावर ढकलून किंवा आजचा अभ्यास उद्यावर ढकलून आळशीपणा करणे टाळले पाहिजे. जेणेकरून आजचे काम आजच पूर्ण होईल. आचार्य चाणक्य नुसार, विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आळशीपणा सोडून दिला पाहिजे. जेणेकरून यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
आरोग्य
बरेच विद्यार्थी परीक्षेवेळी आजारी पडतात. कारण तणावामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे जेवण कमी होते. आणि यामुळे आजारी पडण्याचे चान्सेस वाढतात. परंतु परीक्षेवेळी प्रत्येक विद्यार्थ्याने आहाराकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी सात्विक आहार घेतला पाहिजे. जेणेकरून आरोग्य चांगले राहील. आणि अभ्यास करताना झोप येणार नाही.