आज-काल नोकरीपेक्षा बिझनेस कडे सर्वांचा जास्त कल दिसत आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय करावा अशी आशा असते. परंतु गुंतवणुकीसाठी लागणारा जास्तीत जास्त पैसा त्यांना परवडणारा नसतो. अशातच जर तुम्ही देखील नवीन बिजनेस करण्यासाठी एखादा प्रॉडक्ट चा विचार करत असाल तर तुम्ही यामध्ये कमी किमतीत गुंतवणूक करू शकतात. हा बिझनेस म्हणजे एक प्रकारची फ्रेंचाईजी आहे. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून प्रचंड फायदा करून घेऊ शकता.
डेअरी प्रोडक्ट हे वर्षानुवर्षे मार्केटमध्ये डिमांड वर असतात. हा व्यवसाय कधीही संपणारा नसून गरजेच्या वस्तू पैकी एक आहे. डेरी प्रॉडक्ट च्या नावाने नावाजलेली कंपनी म्हणजे अमूल. ही अमूल कंपनी देशभरातील करोडो व्यापाऱ्यांना अमूल फ्रेंचाइजी ऑफर करते. या फ्रेंचाईच्या माध्यमातून आपण प्रचंड फायदा मिळवू शकतो. त्याचबरोबर तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत ही फ्रेंचाईजी सुरू करू शकतात.
अमूल फ्रेंचाईजी घेण्यासाठी तुमच्याकडे मेन रस्त्यावर किंवा मार्केटमध्ये एक दुकान असणे गरजेचे आहे. अमोल दोन प्रकारच्या फ्रॅंचाईजी ऑफर करत आहे त्यामध्ये पहिली म्हणजे अमूल आउटलेट त्यालाच अमूल रेलवे पार्लर किंवा अमूल क्योस्क म्हणतात. आणि दुसरी म्हणजे अमूल आईस्क्रीम स्कुपिंग पार्लर. जर तुम्ही पहिल्या फ्रेंचाईजी मध्ये व्यवसाय करू इच्छित असाल तर तुम्हाला 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्याचबरोबर जर तुम्ही दुसऱ्या फ्रेंचाईजी मध्ये व्यवसाय करू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये गुंतवावे लागतील.
अमूलच्या फ्रेंचाईजी मध्ये तुम्हाला नॉन रिफंडेबल सिक्युरिटी यासाठी 25 ते 50 हजार रुपये भरावे लागतात. जर तुम्ही अमूलची आउटलेट किंवा अमूल रेलवे पार्लर ची फ्रेंचाईजी घेणार असाल तर तुम्हाला नॉन रिफंडेबल सिक्युरिटी अंतर्गत 25 हजार रुपये भरावे लागतात. त्यानंतर तुम्हाला 1 लाख रुपये रिनोवेशन, इक्विपमेंट साठी 75000 रुपये लागतील म्हणजेच तुम्हाला यासाठी संपूर्ण खर्च 2 लाख एवढा येऊ शकतो. त्याचबरोबर जर तुम्ही अमूल आईस्क्रीम पार्लर फ्रेंचाइजी ओपन करणार असाल तर त्यासाठी जास्त खर्च येईल. यामध्ये नॉन रिफंडेबल सिक्युरिटी अंतर्गत 50000 रुपये, 4 लाख रुपये रिनोवेशन, 1.5 लाख रुपये इक्विपमेंट साठी लागतात.
अमूल कंपनीकडून एमआरपी वर कमिशन
अमूल आउटलेट वर अमूल कंपनीकडून मिनिमम सेलिंग प्राईस म्हणजेच एमआरपी वर कमिशन दिल्या जातं. यामध्ये मिल्क पाऊच वर 2.5% मिल्क प्रॉडक्ट वर 10 टक्के, आईस्क्रीम वर 20% कमिशन दिल्या जातं. त्याचबरोबर आईस्क्रीम स्कुपिंग पार्लर साठी रेसिपी बेस्ड आईस्क्रीम, शेख, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंक वर 50 टक्के कमिशन दिल्या जातो. त्याचबरोबर प्री-पेक आईस्क्रीम वर 20% आणि अमूल प्रॉडक्ट वर कंपनी 10 टक्के कमिशन देते.