नवी दिल्ली – बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली-एनसीआर (दिल्ली राजधानी प्रदेश) मध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी काही निर्बंधांसाह ‘ग्रीन फटाक्यां’चा वापर करण्यास परवानगी दिली. दिल्ली व्यतिरिक्त, दिल्ली एनसीआरमध्ये नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद आणि इतर अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.
न्यायालयाचा आदेश काय :
लाइव्ह लॉ आणि बार अँड बेंचनुसार, न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे की 15 ऑक्टोबर (बुधवार) ते 21 ऑक्टोबर पर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये ‘ग्रीन फटाके’ विकले जाऊ शकतात. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, हे फटाके फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच विकले जाऊ शकतात. पोलिसांशी सल्लामसलत करुन संबंधित जिल्हाधिकारी आणि आयुक्त ही ठिकाणं निश्चित करतील.
उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात प्रदूषण :
उत्तर भारतातील अनेक राज्ये, विशेषतः पंजाब, हरियाणा आणि दिल्ली, वायू प्रदूषणाच्या धोक्याशी झुंजत आहेत. परिणामी, दिवाळी साजरी करताना फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे अनेक लोक चिंतेत आहेत. फटाक्यांशिवाय दिवाळीचा सण अपूर्ण आहे असं अनेक लोक मानतात, तर काहीजण पर्यावरणाच्या कारणास्तव ते टाळण्याचा सल्ला देतात. या संदर्भात, ‘ग्रीन फटाके’, जे कमी धूर सोडतात आणि पर्यावरणाचं कमी नुकसान करतात, ते या समस्येचं निराकरण करण्यास काही प्रमाणात मदत करु शकतात.
Supreme Court allows sale, bursting of green firecrackers in Delhi-NCR during Diwali
Read directions: https://t.co/521WcYUfZ0 pic.twitter.com/b3cdHgKDMs
— Bar and Bench (@barandbench) October 15, 2025
‘ग्रीन फटाके’ म्हणजेस काय :
खरं तर, ‘ग्रीन फटाके’ हे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं (NEERI) विकसित केले आहे. ते पारंपारिक फटाक्यांसारखेच असतात परंतु जाळल्यावर कमी प्रदूषण करतात. NEERI ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) अंतर्गत एक सरकारी संस्था आहे. ‘ग्रीन फटाके’ नियमित फटाक्यांसारखे दिसतात, जळतात आणि आवाज करतात, परंतु ते कमी प्रदूषण करतात. नियमित फटाक्यांच्या तुलनेत, ते जाळल्यावर 40 ते 50 टक्के कमी हानिकारक वायू निर्माण करतात.
चार प्रकारचे ‘ग्रीन फटाके’ :
‘ग्रीन फटाक्यां’मध्ये वापरले जाणारे घटक हे नेहमीच्या फटाक्यांपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळे असतात. NEERI ने कमी हानिकारक वायू निर्माण करणारे सूत्रे विकसित केली आहेत. या ‘ग्रीन फटाक्यां’मध्ये एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे जे त्यांना नेहमीच्या फटाक्यांपेक्षा वेगळं करते. NEERI नं चार प्रकारचे ‘ग्रीन फटाके’ विकसित केले आहेत. हे फटाके जाळल्यावर पाण्याचे कण तयार करतात, ज्यामध्ये सल्फर आणि नायट्रोजनचे कण विरघळतील. NEERI ने त्यांना सेफ वॉटर रिलीजर्स असं नाव दिलं आहे. जल प्रदूषण कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग मानला जातो.
कमी सल्फर आणि नायट्रोजन तयार करणारे फटाके :
NEERI नं या फटाक्यांना स्टार क्रॅकर्स असं नाव दिलं आहे, म्हणजे सेफ थर्माइट क्रॅकर्स. ते ऑक्सिडायझिंग एजंट वापरतात, जे जाळल्यानंतर कमी सल्फर आणि नायट्रोजन तयार करतात. यासाठी विशेष रसायने वापरली जातात. या फटाक्यात सामान्य फटाक्यांपेक्षा 50 ते 60 टक्के कमी अॅल्युमिनियम वापरला जातो. संस्थेनं त्याला सेफ मिनिमल अॅल्युमिनियम किंवा सफाल असं नाव दिलं आहे.